संपादकीय
नीलिमा गुंडी
१० ऑगस्ट २०२२
ऑगस्ट १९८९ मध्ये सुरू झालेल्या संस्थापक संपादक विद्या बाळ ह्यांच्या ‘मिळून सार्याजणी’ या मासिकाने वीस वर्षे पूर्ण केली; ही एक विशेष नोंद घेण्यासाठी गोष्ट आहे. एखादे मासिक चालवणे, ही किती कष्टप्रद गोष्ट आहे, याची आपण कल्पना करू शकतो. मात्र भाषेच्या आणि समाजाच्या जपणुकीसाठी नियतकालिकांची नितांत गरज असते. समाजाची केवळ जपणूक करणेच नव्हे, तर समाजाला वेळोवेळी वास्तवाभिमुख करणे, यासाठी त्याची नव्याने उभ…